सचिन दीक्षित यांचे Temples of Lonar हे पुस्तक विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://www.flipkart.com/temples-of-lonar/p/itm0a978d9ac09e0 अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk विदर्भ म्हणजे भारताच्या सत्तेचं प्राचीन केंद्र! विदर्भाला हजारो वर्षांचा वारसा आहे, जो आजही जगासाठी गुपित आहे. विदर्भ नावाचा उगम, महाभारतातील रुक्मिणी हरणाचे संदर्भ, वाकाटकांनी अजिंठा लेण्यांमध्ये ओतलेली समृद्धी, जगाचं केंद्र मानलं जाणारं वाशिम, नागपूरची अश्मयुगीन रहस्य आणि गोंड राजांचा विसरलेला पराक्रम अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा केली आहे इतिहास अभ्यासक सचिन दीक्षित यांच्याशी. Vidarbha is more than just a region; it’s a living story of history and power. In this episode, we explore the roots of that legacy with historian Sachin Dixit. From the first recorded mentions in the Mahabharata and the golden era of the Vakatakas to the mystery of Washim and the glory of the Gond empire, we uncover the stories behind the land we think we know. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: सचिन दीक्षित (इतिहास अभ्यासक) Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Nisarga, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Social Media Executive: Varada Sane. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Manager: Sai Kher. About The Hosts Shardul Kadam: Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication Consultant With over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a 3 Cr turnover and a 20-member team. Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy. Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu. Omkar Jadhav: Co-founder – Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast Consultant With 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol. Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata. Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala Story Host of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics. Visiting Faculty – Ranade Institute, Pune University. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts 00:00 - Introduction 04:19 - Origin of the Name Vidarbha in Ramayana and Mahabharata 05:06 - Geography, Cultural Identity & boundaries between Vidarbha, Marathwada 09:04 - Ancient References & Literature 12:01 - Archaeological Proofs & Iron Age and burial sites in Nagpur and Chandrapur 14:13 - Ashoka's Inscriptions & Ancient Cities like Washim, Nagpur, and Amravati 15:40 - The Vakataka Dynasty and its contributions to the Ajanta Caves 23:40 - Bahubali connection to Vidharbha 26:33 - Political History & District Shifting and How British and Nizam rule changed geography 28:15 - Mahur, Chandrapur & the Gond Community and Mahur's Parshuram, Chandrapur's Mahakali 33:14 - The Gond Kingdom 41:53 - Cultural Gems and the unique heritage of Vidarbha 46:44 - Saint Traditions & Social Reform and their role in the freedom struggle 48:14 - Sevagram & Mahatma Gandhi 53:51 - Vidarbha's Local Produce & Food Culture and Nagpur's silk sarees 58:13 - Lonar Crater & Ancient Temples 01:02:05 - Vidharbha Language 01:10:15 - Jainism in Vidarbha
ADVERTISEMENT
मी वर्धा जिल्ह्यांतील आर्वी तालुक्यामधील आहे आणि मी गोंड जातीचा आहे दीक्षित साहेबांनी जो गोंडाचा इतिहास सांगितला तो एकदम खरा आहे कारण मी नागपूर विद्यापीठातून M A इतिहास केले आणि गोंडांचा इतिहास MA इतिहास सेकंड ईयर लास्ट सेमिस्टर ला आहे. मंजे ज्याने MA इतिहास पूर्ण केले त्यालाच हा इतिहास माहीत आहे. आणि दुसरे जैन लोकांच सांगितल की मराठी जैन म्हणून आहे ते पण खर आहे त्यांना आम्ही वाणी म्हणतो त्यांचे आडनाव वडाळकर, कहाते, सावरकर, सोइतकर असे आहे मला खूप छान वाटत आहे की विदर्भाच्या इतिहास बद्दल कोणी इतके भरभरून सांगत आहे ❤
Finally...someone talking about vidarbh...पुण्या मुंबईला आली आठवण विदर्भाची..
विदर्भाचा इतिहास भाग २ लवकरच घेऊन येऊ!
Finally आमच्या विदर्भावर कोणाची तरी नजर पडली आणि हे सर्व highlight झालं. Thanks amuktamuk team🙏
हळूहळू. येत आहेत गा आपल्या विदर्भा कडे ❤ धन्यवाद
खूप छान मी विदर्भ यवतमाळ चा गोंड आदिवासी आहे जय सेवा 🙏 जय गोंडवाना 💛🙏
माझी एक मैत्रीण होती संभाजी नगर मध्ये मी तिच्या TC वर जात ' राजगोंड ' अस लिहिलं होत. मी मजेत तू तर राजघराण्यातील आहे असा म्हणालो, आज कळलं ती खरच राजघराण्यातील आहे 😅
सचिन दीक्षितांना पुन्हा पुन्हा बोलवा. खूप कमाल माणूस आहे
शेवटी कुणी तरी बोल बा विदर्भाच्या जून्या संस्कृती वर ❤
महाराष्ट्रातलं आता सध्याचे शासन असो अथवा इतर कोणत्याही प्रकारचे नेते असतील किंवा मग पत्रकार असतील त्यांना खरंतर मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भाग याचा काहीही संबंधच नसल्यासारखं ते वावरतात. दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली मध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर येतो, तिथल्या लोकांना तिथल्या कोळसा खाण्याचा, तसेच वाढत्या प्रदूषणाचा त्रास होत आहे तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टींची साधी बातमी सुद्धा होत नाही. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना मुंबई पुणे नागपूर आणि संभाजीनगर या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही.
मित्रांनो तुम्ही आज खऱ्या अर्थाने आज विदर्भाचा ऐतिहासिक अनुशेष भरून काढला आहे...महाराष्ट्राच्या जनतेला विदर्भातील ऐतिहासिक स्थानं, गोंड आदिवासी परंपरा आणि विदर्भाचं एकूणच ऐतिहासिक महत्त्व ह्याची सखोल माहिती सांगितल्याबद्दल दीक्षित सर आणि तुमचे खूप खूप आभार...दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे... हे पॉडकास्ट खूण म्हणून साठवून ठेवले आहे...खूप अभिनंदन
विदर्भातील वस्त्रोद्योग ह्याचा मोठा इतिहास आहे तो ऐकायला आवडेल. विदर्भात बऱ्याच बोली आहेत. गोंडी, कोष्टी, लभानी, बंजारा, वडार आणि बऱ्याच.... ह्यांचा तसा मराठी सोबत फारच कमी संबंध पण का? हे पण ऐकायला आवडेल. विदर्भात स्थानांतरित लोक खूप आहेत. कोष्टी, कोमटी, तेलगु जाती, मारवाडी, गुजराती, बंजारा, लभान, वडार वगैरे कुढूण आले. हे पण ऐकायला आवडेल 🙏🙏🙏
महाराष्ट्राचे आदर्श, दैवत, छत्रपती शिवाजीमहाराज यांची आई विदर्भातील, अजून काय हवंय proud feel karayala! Jyana aapan magaslele watato may only because of our dialect, they hardly have anything of their origin!
सचिन दीक्षितजी, विदर्भ प्रदेशावर आधारित आपला पॉडकास्ट म्हणजे एक शब्दांचा सुखद प्रवास आहे. या मातीचा तुमचा व्यासंग आणि सखोल अभ्यास खरोखरच अचंबित करणारा आहे. तुमच्या बोलण्यात येणारे 'गोरस पाक'सारखे सुक्ष्म संदर्भ असोत किंवा माहूरच्या रेणुका माता, संतश्रेष्ठ दावले महाराजांचे दाखले, यावरून हे स्पष्ट जाणवते की तुम्ही या प्रदेशाचा केवळ अभ्यास केला नाही, तर तो जगला आहे. इतकी सूक्ष्म माहिती गोळा करणे आणि ती इतक्या रसाळ भाषेत मांडणे हे केवळ तुमच्यासारख्या समर्पित अभ्यासकालाच शक्य आहे. विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे इतके सुंदर दर्शन घडवल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार. हा अनुभव खरोखरच थक्क करणारा आहे 🙏🏻
सर विदर्भातील बौद्धकालीन इतिहास यावर कमी बोलले 🙏
I am from Vidharbha, so I knew half of these things he discussed, but the way he put it in context was so enlightening. I am so thankful for this podcast, I just wish I could also ask my questions to him.
श्री दीक्षित सरांनी चार्मोशी तहसील, गडचिरोली जिल्हा येथील मार्कांडा देवस्थान चा अभ्यास करावा अशी विनंती करतोय. जसे त्यांनी सेवाग्राम चे उदाहरण दिले ना. तसेच हेही संस्थान आहे, चिरेबंदी दगडावर उत्कृष्ट नक्षीकाम आणि शिल्प कोरलेली आहेत. अगदी स्पष्ट व जिवंत वाटतात, त्याचा अभ्यास नक्की व्हावंयास हवा🙏हेच मंदिर पश्चिम महारष्ट्रात असते तर ख्याती झाली असती 🙏
महाराष्ट्रातल्या बातम्या सुधा जर बघितल्या तर त्या बातम्या मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या व्यतिरिक्त तुम्ही कधी गोंदिया भंडारा किंवा गडचिरोली केव्हा नंदुरबार सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपैकी कधी ऐकलं सुद्धा नसेल. यामुळेच तर त्या लोकांना महाराष्ट्र विषयी इतकं काही वाटत नाही, महाराष्ट्राचं एकत्रीकरण अजून चांगल्या प्रकारे व्हायला हवं. करण महाराष्ट्र एकत्र राहिला तर आपली मराठी संस्कृती आपल्या महाराष्ट्र मध्ये असलेल्या विविध बोलीभाषा आणि इतर संस्कृत्या परंपरा या जगतील. नाहीतर उत्तर भारतीय अतिक्रमणात सगळं काही नष्ट होऊन जाईल.
Nal दयामंती नागपूर ची आहे , रुक्मिणी स्वयंवार अमरावती च्या अंबा देवी च्या मंदिरातून गेली आहे,आज नदी चा नाला झाला, कृष्ण मंदिर आहे
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं 🔥